राकेश टिकैत मुंबईत दाखल, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीला राहणार उपस्थित

राकेश टिकैत मुंबईत दाखल, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीला राहणार उपस्थित

| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 11:27 AM

शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत (Farmer leader Rakesh Tikayat) मुंबईमध्ये (mumbai) दाखल झाले आहेत. ते आज मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

मुंबई: शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत (Farmer leader Rakesh Tikait)  मुंबईमध्ये (mumbai) दाखल झाले आहेत. ते आज मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. दुपारी 12 वाजता आझाद मैदानावर संयुक्त किसान मोर्चाची बैठक आहे. या बैठकीला ते संबोधित करणार आहेत. टिकैत यांच्याशी टीव्ही 9 च्या प्रतिनिधीने संवाद साधला आहे. जोपर्यंत एमएसपी लागू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी टिकैत यांनी दिला.