VIDEO : Mumbai Avighna Park Fire | अविघ्न पार्कची आग 19व्या मजल्यावरून 25व्या मजल्यावर पोहोचली

VIDEO : Mumbai Avighna Park Fire | अविघ्न पार्कची आग 19व्या मजल्यावरून 25व्या मजल्यावर पोहोचली

| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 1:55 PM

मुंबई येथील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना दुपारी 12 वाजता  समोर आली. आता अविघ्न पार्कची आग 19व्या मजल्यावरून 25व्या मजल्यावर पोहोचली आहे. करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारत आहे. 

मुंबई येथील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना दुपारी 12 वाजता  समोर आली. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आता अविघ्न पार्कची आग 19व्या मजल्यावरून 25व्या मजल्यावर पोहोचली आहे. करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारत आहे.