Pushpak Express Accident : लोकलमधून पडले अन् एक्सप्रेसला घासले गेले; 5 प्रवाशांचा दुर्दैवी अंत

Pushpak Express Accident : लोकलमधून पडले अन् एक्सप्रेसला घासले गेले; 5 प्रवाशांचा दुर्दैवी अंत

| Updated on: Jun 09, 2025 | 10:51 AM

Pushpak Express Accident News : कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दिवा – मुंब्रा स्थानकादरम्यान कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लोकलला लटकलेले प्रवासी एक्स्प्रेसला घासले गेल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मृत्यू झालेले सहा जण कसारा-सीएसएमटी लोकलमधील प्रवासी होते, असंही समजतंय. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान हे प्रवासी खाली पडले. छत्रपती शिवाजा महाराज टर्मिनलवरून पुष्पक एक्स्प्रेस निघाली होती. तर कसाऱ्याहून सीएसएमटीकडे लोकल जात होती. या लोकलच्या दरवाजावर लटकलेले प्रवासी एक्स्प्रेसला घासले गेले आणि त्यांचा तोल जाऊन त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Published on: Jun 09, 2025 10:51 AM