मिलिंद देवरा मिंधे गटाचे दिल्लीतील दूत! सामनातून काय केला हल्लाबोल
देवरा यांचे मिंधे व्हिजन या हेडलाईनने सामनाचा आजचा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. मिलिंद देवरा यांना मिंधे गटात दिल्लीतील दूत म्हणून काम मिळेल, असा खोचक टोलाही सामनातून लगावण्यात आलाय. तर उद्योगपतींच्या मध्यस्थीनेच देवरा मिंधे गटात पोहोचले असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आलाय.
मुंबई, १६ जानेवारी २०२४ : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी शिवसेना शिंदे गटात त्यांनी जाहीररित्या प्रवेश केला. दरम्यान यावरूनच सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. देवरा यांचे मिंधे व्हिजन या हेडलाईनने सामनाचा आजचा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. मिलिंद देवरा यांना मिंधे गटात दिल्लीतील दूत म्हणून काम मिळेल, असा खोचक टोलाही सामनातून लगावण्यात आलाय. तर उद्योगपतींच्या मध्यस्थीनेच देवरा मिंधे गटात पोहोचले असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आलाय. ‘मिलिंद देवरा यांना कोणताही खास जनाधार नाही. उद्योगपतींच्या वर्तुळात त्यांचा वावर आहे. मिंथे गटास दिल्लीत त्याकामी एक ‘दूत’ मिळाला व देवरा यांना फार तर मिंधे गटाचे दिल्लीतील ‘दूत’ म्हणून काम मिळेल. बदल्यात राज्यसभा मिळेल. मिंधे गटास दिल्लीत एक ‘पटेल’ मिळाले व देवरांना नवे व्हिजन मिळाले. यात राष्ट्रकारण व समाजकारण अजिबात नाही’, असे सामनातून म्हटले आहे. तर महाराष्ट्राच्या हिताचा तर विषयच नाही. देवरा यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, पण मिंधे गटाच्या व्हिजनमुळे काँग्रेस सोडली, असे बोलून त्यांनी स्वतःचीच अवहेलना करू नये, असे म्हणत त्यांना खोचकपणे आवाहनही करण्यात आले आहे.
