Ganesh Chaturthi 2021 | मुंबईच्या सिद्धिविनायक आणि नागपुरातील टेकडी गणपतीची आरती लाईव्ह
आज गणेश चतुर्थी निमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक गणपती, पुण्याच्या दगडूशेठ गणपती आणि नागपुरातील प्रसिद्ध टेकडी मंदिर गणपतीची आरती लाईव्ह दाखवण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात तिसऱ्या लाटेचा धोका पाहता निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाही भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाचे ऑनलाईन दर्शनच करावे लागत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान जमावबंदी असणार आहे. गणपतीच्या आगमनाला फक्त काही तास शिल्लक आहेत. या दरम्यान मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होऊ नये म्हणून मुंबईत कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान मुंबईत जमावबंदी असणार आहे. मुंबई पोलिसांकडून या संदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या आहेत.