गोंविदानं दाऊदच्या मदतीने निवडणूक लढविली होती, राम नाईक आरोपांवर ठाम

| Updated on: Mar 30, 2024 | 2:09 PM

अभिनेता गोंविदा यांनी 2004 मध्ये भाजपा नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यानंतर राम नाईक यांनी गोंविदावर दाऊदची मदत घेतल्याचा राम नाईक यांनी केलेला आरोप पुन्हा चर्चेत आला आहे. या आपल्या आरोपावर आपण आजही ठाम असल्याचे राम नाईक यांनी म्हटले आहे.

Follow us on

मुंबई : सिने अभिनेता गोंविदा 14 वर्षांच्या काळानंतर पुन्हा राजकारणात उतरला आहे. यावेळी गोंविदाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केला आहे. गोविंदा याने कॉंग्रेसच्या तिकीटावर साल 2004 मुंबई – उत्तर मतदार संघातून सलग पाच वेळा जिंकलेल्या भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव केला होता. या पराभवाने भाजपाला मोठा धक्का बसला होता. मात्र गोंविदाने आपल्या खासदारकीच्या काळात राजकारणाला गांभीर्याने घेतले नाही. आता पुन्हा 14 वर्षांच्या काळानंतर गोंविदाने राजकारणात प्रवेश केला आहे. गोंविदाला उत्तर- पश्चिम मतदार संघातून उतरविण्याची एकनाथ शिंदे यांची योजना आहे. गोंविदाने आपल्या हरविण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची मदत घेतल्याचा आरोप राम नाईक यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना साल 2016 रोजी केला होता. या आरोपाबद्दल राम नाईक यांना विचारले असता त्यांनी आपण या आरोपावर ठाम असून आपण लिहीलेल्या पुस्तकातून हा आरोप केला होता. त्यास अद्यापर्यंत कोणीच आव्हान दिले नसल्याचे भाजपाचे नेते राम नाईक यांनी म्हटले आहे.