Gunaratna Sadavarte : सदावर्ते राज ठाकरेंवर भडकले, कलम 19 लावा, त्यांना पाकिस्तानी खाज….मुझे ये नही बोलना की…
भारताकडून पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर सर्वच स्तरातून भारताचं कौतुक केलं जात आहे. यानंतर सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. पण राज ठाकरेंची प्रतिक्रिया काहिशी नकारात्मक असल्याचे पाहायला मिळाले. यावर सदावर्तेंनी भाष्य केले. कोण राज ठाकरे? त्यांच्या बोलण्याला काय किमंत?
पाकिस्ताना हा आधीच बरबाद झालेला देश आहे, त्याला काय बरबाद करताय तुम्ही? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. पुढे राज ठाकरे असेही म्हणाले की, ज्या अतिरेक्यांनी तुमच्यावर हल्ला केला, ते अतिरेकी अजून सापडलेले नाहीत. हजारो पर्यटक जिथे जातात तिथे सुरक्षा का नव्हती?. मॉकड्रीलपेक्षा पण कोम्बिंग ऑपरेशन करणं जास्त गरजेच आहे. एअर स्ट्राइक करुन लोकांना वेगळ्या ठिकाणी भरकटवण यावर युद्ध हे उत्तर होऊ शकत नाही, पाकिस्तानातील एअर स्ट्राइकनंतर राज ठाकरे यांनी अशी पहिली प्रतिक्रिया दिली. यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. ‘राज ठाकरेंच्या बोलण्यात देशप्रेम दिसतंय का? देश प्रेम पहिले महत्त्वाचं आहे. ज्या गोष्टी पाकिस्तानचा ब्रोडकास्टिंग मिनिस्टर मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन अंतराष्ट्रीय चॅनेलवर येऊन जी भाषा बोलतो तिच भाषा राज ठाकरे बोलत आहे.’, असं सदावर्ते म्हणाले. तर राज ठाकरेंची मती मारली गेली का? राज ठाकरे विदेशात फिरून आल्यानंतर त्यांना पाकिस्तानी खाज आली असल्याचे त्यांनी म्हटलंय.
