Amruta Fadnavis यांच्याकडून होळीच्या शुभेच्छा; टि्वट करुन धुळवडीचे फोटो केले शेअर

Amruta Fadnavis यांच्याकडून होळीच्या शुभेच्छा; टि्वट करुन धुळवडीचे फोटो केले शेअर

| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 5:09 PM

जवळपास दोन वर्षांनंतर धुळवडीचा आनंद सर्वांना लुटता येणार आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे गेली दोन वर्षे धुळवड नेहमीसारखी साजरी करता आली नाही. मात्र यंदाच्या वर्षी रंगांची जोरदार उधळण होत आहे.

जवळपास दोन वर्षांनंतर धुळवडीचा आनंद सर्वांना लुटता येणार आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे गेली दोन वर्षे धुळवड नेहमीसारखी साजरी करता आली नाही. मात्र यंदाच्या वर्षी रंगांची जोरदार उधळण होत आहे. सामन्यांपासून सेलिब्रेटी, कलाकार, खेळाडू आणि राजकीय नेते मंडळींनी देखील आज धुळवड साजरी केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरीदेखील धुळवड साजरी करण्यात आली आहे. त्यांच्या घरी करण्यात आलेल्या सेलिब्रेशनचे फोटो फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात फडणवीस दाम्पत्य त्यांच्या मुलीसोबत धुळवड साजरी करत आहेत. संपूर्ण देशभरात आज थुळवड साजरी केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज भोकरदन येथे धुळवड साजरी केली. आज दानवे यांचा वाढदिवसदेखील आहे. त्यामुळे दानवे यांनी आज होळीसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशनदेखील केलं.

Published on: Mar 18, 2022 04:54 PM