Pune Rain | पुण्यात मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानक परिसरात पाणी तुंबलं

| Updated on: Oct 05, 2021 | 9:16 AM

मुसळधार पावसानं पुणेकरांना चांगलंच झोडपून काढलं आहे. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी सांचलं आहे. भुयारी मार्गात पाणी साचल्यानं तिथे असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे.

Follow us on

मुसळधार पावसानं पुणेकरांना चांगलंच झोडपून काढलं आहे. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी सांचलं आहे. भुयारी मार्गात पाणी साचल्यानं तिथे असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं नागरिकांनी पाऊस थांबल्याशिवाय घराबाहेर पडू नका, तसंच घरात असाल तर बाहेर पडू नका असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलंय.

पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपल्या च्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा, असं आवाहन मोहोळ यांनी केलं आहे.