Heavy Rain Update | राज्यात पुढील 2 महिने सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता

Heavy Rain Update | राज्यात पुढील 2 महिने सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता

| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 8:44 AM

IMD | देशभरात या काळात सरासरीच्या 95 ते 105 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महन्यात देशात सर्वत्र पाऊस पडेल असाही अंदाज आयएमडीच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाकडून यंदा प्रथमच पावसाळ्यात प्रत्येक महिन्यात हवामानाचा अंदाज जारी करण्यात येत आहे. हवामान विभागाचे मुख्य अधिकारी डॉ.महापात्रा यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला. पावसाळ्याच्या या कालावधीमध्ये मान्सूनचा पाऊस सरासरी इतका राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरी इतका पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सन 2021 च्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात पाऊस सरासरी इतका कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात या काळात सरासरीच्या 95 ते 105 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महन्यात देशात सर्वत्र पाऊस पडेल असाही अंदाज आयएमडीच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.

Published on: Aug 03, 2021 08:44 AM