Pune | पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बोरघाटात मुसळधार पाऊस, वाहतूक धिम्या गतीने सुरू

| Updated on: Jun 10, 2022 | 8:45 PM

गेल्या काही दिवसांपासून मावळ, लोणावळा परिसरात ढगाळ वातावरण तयार होतं. मात्र पाऊस काही लागत नव्हता. पण आज दमदार पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Follow us on

लोणावळा (पुणे) : जून महिना सुरू झाला असून अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर अजूनही काही ठिकाणी पावसाची वाट पहावी लागत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावत दाणादाण उडवून दिली. ज्यामुळे हैराण झालेल्या जनतेला गारवा मिळत आहे. आज लोणावळा-खंडाळा (Lonavla-Khandala) भागात ही जोरदार पावसाने बॅटींग केली. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर (Pune-Mumbai Expressway) बोरघाटात मुसळधार पावसाला (Heavy Rain) सुरुवात झाली. त्यामुळे या मार्गिकेवरची वाहतूक धीमी झाल्याचे पहायला मिळाले. तर गेल्या काही दिवसांपासून मावळ, लोणावळा परिसरात ढगाळ वातावरण तयार होतं. मात्र पाऊस काही लागत नव्हता. पण आज दमदार पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.