Pune | पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

| Updated on: Jun 10, 2022 | 9:03 PM

रस्त्यावर पाणी साठल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तर पायी जाणाऱ्या नागरिकांना तुंबलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत होती.

Follow us on

पुणे : जून महिन्याला सुरूवात झाली असून एक आठवडा संपला आहे. तर दुसऱ्या आठवड्यातील दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागांचे कधी मान्सूनपुर्व पाऊस (Pre monsoon)लागणार याकडे लक्ष लागले आहे. तर पावसाला सुरूवात झाली नसल्याने पेरणीच्या कामांना विलंब होत आहे. तसेच राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने पेरणीपुर्व मशागतींच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान पुण्यात या सरी कधी बरसणार असे पुणेकर गर्मीमुळे हैराण होऊन म्हणत होते. त्यांना आज दिलासा मिळाला आहे. पुण्यात आज दमदार पाऊस (Heavy Rain) झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. तर पुणे शहर, पिंपरी आणि चिंचवड परिसरात अखेर विजांच्या गडगडाटासह पाऊस (Pune Rain)पडला. दरम्यान, केवळ अर्धा तास पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साठले. रस्त्यावर पाणी साठल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तर पायी जाणाऱ्या नागरिकांना तुंबलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत होती.