Jalna Unseasonal Rain Loss | अस्मानी संकटाचा कहर… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके… हाताशी आलेली 60 टक्के पिकं गेली

Jalna Unseasonal Rain Loss | अस्मानी संकटाचा कहर… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके… हाताशी आलेली 60 टक्के पिकं गेली

| Updated on: Mar 31, 2026 | 1:27 PM

जालना जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास आणि मध्यरात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा बसला आहे. विशेषतः बदनापूर तालुक्यातील सोमठाणा परिसरातील द्राक्षांच्या बागा मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्या आहेत.

जालना जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास आणि मध्यरात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना प्रचंड तडाखा बसला आहे. विशेषतः बदनापूर तालुक्यातील सोमठाणा परिसरातील द्राक्षांच्या बागा मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्या आहेत. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या फळबागांमध्ये मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी द्राक्षांचे घड खाली पडले असून, काही ठिकाणी फांद्या मोडून जमिनीवर आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उत्पन्नात 60 ते 70 टक्के घट होण्याची शक्यता आहे, अशी शेतकऱ्यांनी माहिती दिली आहे. कालच्या पावसामुळे फळबाग उत्पादकांसोबत कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे त्वरित नुकसान भरपाईची मागणी केली असून, या घटनेमुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे आणि प्रशासनाच्या तातडीच्या प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Published on: Mar 31, 2026 01:18 PM
Follow Us