Jalgaon News : जळगाव हादरलं! प्रेमाचा करुण अंत, मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच गोळ्या घालून घेतला लेकीचा जीव

Jalgaon News : जळगाव हादरलं! प्रेमाचा करुण अंत, मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच गोळ्या घालून घेतला लेकीचा जीव

| Updated on: Apr 27, 2025 | 11:27 PM

Honor Killing In Chopda : जळगावच्या चोपडा तालुक्यात प्रेम विवाह केल्याच्या रागातून बापानेच मुलीचा जीव घेतल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. यात जावई देखील गंभीर जखमी झालेला आहे.

कमी शिकलेल्या मुलाशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांनी मुलीवर गोळीबार केला आहे. जळगावच्या चोपडामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हळदीच्या मंडपात निवृत्त जवानाकडून हा गोळीबार करण्यात आला असून, यात मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जावई गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे सजलेला मंडप क्षणात सामसुम झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात ठेऊन पोटच्या मुलीचा जीव घेतला आहे. मुलीचा बाप हा एसआरपीएफचा सेवानिवृत्त अधिकारी आहे. या गोळीबारात जावई देखील गंभीर जखमी झाला आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीने तिच्यापेक्षा कमी शिकलेल्या मुलाशी प्रेमविवाह केल्याचा राग वडिलांच्या मनात होता. याच रागातून तृप्ती वाघ हिची तिच्या वडिलांनीच गोळ्या घालून हत्या केली. धक्कादायक म्हणजे मयत तृप्ती ही चार महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे या एकाच घटनेत दोन जीव गेले आहेत.

Published on: Apr 27, 2025 11:27 PM