MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 5 November 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 5 November 2021

| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 6:22 PM

आरोपी नसतानाही माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांनाही अटकेची भीती वाटत आहे. (hrishikesh deshmukh not appear in ed office)

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांनाही अटकेची भीती वाटत आहे. त्यामुळेच ते कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचं वकील इंदरपाल सिंग यांनी सांगितलं.

अनिल देशमुख यांचे वकील अ‍ॅड. इंदरपाल सिंग यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. देशमुख प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आणि हायकोर्टात खटला सुरू होता. तुम्ही आरोपी नाहीत. त्यामुळे तुम्ही चौकशीसाठी या असं प्रतिज्ञापत्रं ईडीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलं होतं. त्यानंतर अनिल देशमुख हे स्वत:हून चौकशीला हजर झाले. मात्र, त्यांना अटक करण्यात आली. ते तुम्ही पाहत आहात. त्यामुळे ऋषिकेश देशमुख यांनाही आपल्याला अटक होऊ शकते याचे भान आहे. त्यामुळे ते कायदेशीर बाबी तपासून पाहत आहेत, असं इंदरपाल सिंग यांनी सांगितलं.