वांद्र्यातील अनधिकृत बांधकाम कारवाईवर काँग्रेस नेता संतापला, त्या प्रश्नाने केली सरकारची अडचण
वांद्रे येथील गरीब नगर झोपडपट्टीमधील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटाव मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. अनधिकृत झोपड्या पाडताना स्थानिक जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, यात काही पोलीस जखमी झाले.
वांद्रे येथील गरीब नगर झोपडपट्टीमधील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटाव मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. अनधिकृत झोपड्या पाडताना स्थानिक जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, यात काही पोलीस जखमी झाले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५०० अतिक्रमणे काढण्यात येत असून, उर्वरित कारवाई पूर्ण करण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
दलवाई म्हणाले, ‘गरीब नगर परिसरातील नागरिकांना दुसरीकडे जागा द्या, त्या क्षेत्राचं नावंच गरीब नगर आहे, मग तिथे गरीब लोकंच राहतात.’ पुढे दलवाई यांनी सवाल उपस्थित केला, “जेव्हा ही लोकं इथे वस्ती करत होती, तेव्हा तुम्ही का नाही कारवाई केली? तुम्ही ३० वर्षांआधीच कारवाई करायला हवी होती. दोन मजली घरे तयार होईपर्यंत तुम्ही काय करत होते?”
