अक्षय शिंदे  प्रकरणात मला धस यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही,काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

अक्षय शिंदे प्रकरणात मला धस यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही,काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

| Updated on: Jan 25, 2025 | 4:25 PM

सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या नेमकी कधी झाली. जर कस्टोडियल डेथ आहे तर तो ऑफीसर नोकरीत कसा? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

बदलापूर येथील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर वरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी अनेक अक्षय शिंदे प्रकरणात इतका न्याय झटपट करण्याची काय गरज होती. संविधानाने कोर्ट आणि इतर यंत्रणा तयार केलेल्या आहेत. मूळात हे एन्काऊंटर जेथे झाले तेथे चार मुले उभी होती त्यांनी सर्वांना फोन केले होते. त्याची ऑडीओ क्लीप आजही माझ्या ट्वीटर हँडलवर आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. मी जी माहीती मिळवितो ती माझ्या नेटवर्क मधून मिळवतो आणि त्यावर मी ठाम असतो. भाजपा नेते आमदार सुरेश धस यांच्या प्रमाणपत्राची मला काही गरज नाही असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर बेतलेला ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यातील काही दृश्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. मनुवादी लोकांना छत्रपती संभाजी महाराजांचा आता यांना का पुळका आला ? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Published on: Jan 25, 2025 04:24 PM