Maharashtra Rain : अय्यो… इतका तुफान पाऊस की ग्रामपंचायतीनं बांधलेलं शौचालयच वाहून गेलं, राज्यात कुठं धुव्वाधार?
वाशिम जिल्ह्यात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. वाशिम जिल्ह्यातील सात महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे पिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मंठा आणि परतूर तालुक्याला ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. शेतात पाणी साचल्याने पिक पाण्याखाली गेली आहेत.
मराठवाड्यासह विदर्भाला देखील पावसानं जोरदार झोडपलेला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुंबईसह परिसरामध्ये पावसाची रिपरीप आज सकाळपासून सुरूच आहे. अकोल्यातील अकोट तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यात ग्रामपंचायतीने बांधलेलं शौचालय देखील पुरात वाहून गेलं. जालन्याच्या मंठा तालुक्यातील टाकळखोपा आणि शिरपूर शिवारात ढगफुटी सदृश्य पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे गावाजवळ असलेला लघुबंधारा ओसंडून वाहतो आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. ढालेगाव बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडले असून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. गॅस वाहतूक करणारा ट्रक पुराच्या पाण्यात उलटून अपघात झाला. यात चालकाचा मृत्यू झाला.
रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील काजळी नदी दुथडी भरून वाहते आहे. मुंबईत देखील पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दादर, हिंदमाता परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. तर मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरीवली, मालाड, अंधेरी, दहिसर आणि गोरेगाव या भागातील रात्रीपासूनच अधूनमधून पाऊस बरसतो आहे.
