Chandrapur : पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर

Chandrapur : पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर

| Updated on: Jul 09, 2025 | 7:48 PM

विदर्भात पुढील तीन ते पाच दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तर चंद्रपूर,वर्धा,गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 67.8 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. चिमूर तालुक्यात 151 मिलिमीटर, ब्रह्मपुरी तालुक्यात 145 मिलिमीटर, नागभीड तालुक्यात 150 आणि सिंदेवाही तालुक्यात 92 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. पावसाचा जोर कायम असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि कॉलेज यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उद्या सुट्टी देण्यात आली आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून 18000 क्यूमेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती समोर येत असून चंद्रपूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published on: Jul 09, 2025 07:47 PM