Imtiaz Jalil : जलील यांचा संजय शिरसाटांवर गंभीर आरोप, नियम डावलले अन् 6 कोटींची…
संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर भाष्य करत थेट कागदपत्र दाखवून इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावर आरोप केलेत.
संजय शिरसाट यांनी नियम डावलून शेंद्रा एमआयडीसीमध्ये सहा कोटींची जागी घेतली, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. इतकंच नाहीतर मुलाच्या नावाने संजय शिरसाट यांनी ही जागा घेतल्याचा गंभीर आरोपही जलील यांनी केला आहे. यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करत अनेक सवाल केले होते. सिद्धांत शिरसाट यांच्या कमाईचे साधन काय असे विचारत त्यांनी महागडी मालमत्ता खरेदीसाठी त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता इम्तियाज जलील यांनी देखील संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. बघा काय म्हणाले जलील?
Published on: Jun 06, 2025 01:05 PM
