VIDEO : Narayan Rane | तळीयेमध्ये घडलेली दुर्घटना ही दुर्देवी : नारायण राणे

VIDEO : Narayan Rane | तळीयेमध्ये घडलेली दुर्घटना ही दुर्देवी : नारायण राणे

| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 12:58 PM

तळीयेमध्ये घडलेली दुर्घटना ही दुर्देवी असल्याचे देखील नारायण राणे म्हणाले आहेत. नारायण राणे यांनी महाडच्या तळीयेमध्ये येऊन दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली.

तळीये दुर्घटनेत ज्यांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिक सांगतील तिथेच त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज केली. तसेच तळीयेमध्ये घडलेली दुर्घटना ही दुर्देवी असल्याचे देखील नारायण राणे म्हणाले आहेत. नारायण राणे यांनी महाडच्या तळीयेमध्ये येऊन दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. या दुर्घटनाग्रस्तातील सर्वाचं पुनर्वसन करण्यात येईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना मदत दिली जाणार आहे. सर्वांना पक्की घरं बांधून दिली जाईल, असं राणे म्हणाले.