PM Narendra Modi : पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन

PM Narendra Modi : पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन

| Updated on: Apr 27, 2025 | 10:38 AM

पहलगाम हल्ल्यानंतर आता भारताने पाकिस्तानला एकटं पडण्याची पूर्ण तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी स्वत: 13 जागतिक नेत्यांना फोन केलेले आहेत.

पहलगाम हल्ल्यात दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर आता भारताकडून पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी 13 जागतिक नेत्यांना फोन केले असल्याची माहिती समोर आली आहे. तर 30 हून अधिक देशातील राजदूतांच्या अधिकाऱ्यांशी बैठका देखील घेतल्या आहेत. पाकिस्तानला एकटं पडण्याची, कोंडी करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. या बैठकांमध्ये पहलगाम हल्ल्याची माहिती या देशांना दिली जात आहे. तसंच या हल्ल्याशी पाकिस्तानचे असलेले संबध दाखवणारे काही पुरावे देखील ठेवले जात आहेत.

Published on: Apr 27, 2025 10:38 AM