India-Pakistan Conflict : पाकिस्तानात अन्नटंचाई, महागाई वाढणार; भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका

India-Pakistan Conflict : पाकिस्तानात अन्नटंचाई, महागाई वाढणार; भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका

| Updated on: May 04, 2025 | 11:12 AM

India trade embargo on Pakistan : भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने पाकिस्तानसोबत आयात आणि निर्यातीवर व्यापारावर बंदी घातली आहे.

भारताने पाकिस्तानसोबत व्यापारबंदीचा निर्णय घेतला आहे. भारताने आयात आणि निर्णयात पूर्णपणे बंद केली आहे. डोळे वाटारलेल्या पाकिस्तानला भारताने चोख उत्तर दिलं आहे.

भारताकडून पाकिस्तानची व्यापारी कोंडी केली जाते आहे. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने पाकिस्तानसोबत व्यापारावर बंदी घातली आहे. पाकिस्तान साखर, सीमेंटपासून ऑटोमोबाईल पार्टपर्यंतच्या सगळ्या वस्तूंना तरसणार आहे. तर भारताला सुद्धा सुक्या मेव्याला मुकावं लागणार आहे. भारतातून पाकिस्तानात कापूस, भाज्या, सेंद्रिय रसायन, प्लॅस्टिकच्या वस्तु, कॉफी, चहा, मसाले, रंग, तेलबिया आणि दुग्धजन्य पदार्थ निर्यात केले जातात. तर पाकिस्तानातून भारतात तांब्याच्या वस्तु, फळं, काजू आणि ड्रायफ्रूट, केशर, कापूस, गंधक, खनिज इंधन, लोकर आणि काचेची भांडी आयात केली जातात. आता या व्यापार बंदीमुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तांदूळ, कांदा, टोमॅटोसह इतर खाद्य पदार्थ थांबल्याने पाकिस्तानात अन्नटंचाई आणि महागाई वाढेल.

Published on: May 04, 2025 11:11 AM