Operation Sindoor : भारतीय लष्कराने कसा केला हल्ला? पाहा संपूर्ण घटनाक्रम

Operation Sindoor : भारतीय लष्कराने कसा केला हल्ला? पाहा संपूर्ण घटनाक्रम

| Updated on: May 07, 2025 | 3:25 PM

भारतीय सैन्याकडून आज ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेलं आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर मिसाईल अटॅककरुन उद्ध्वस्त करण्याचा हा संपूर्ण घटनाक्रम कसा होता? त्याचा हा व्हिडिओ..

जम्मू काश्मीरमधील एलओसी जवळील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही खबरदारी घेतली जात आहे. एलओसीवर पाकिस्तानी सैन्याकडून अद्यापही गोळीबार सुरू आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. अशातच आज ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानात शिरून दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर मिसाईल अटॅक केला आहे. पाकिस्तानला चांगलाच धडा आज भारताने शिकवला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने संरक्षण क्षेत्रात गोळीबार सुरूच आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून आता एलओसीवरील नागरिकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.

Published on: May 07, 2025 03:25 PM