India-Pakistan War : आम्ही सैन्यासोबत लढायला तयार; सीमावर्ती भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना

India-Pakistan War : आम्ही सैन्यासोबत लढायला तयार; सीमावर्ती भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना

| Updated on: May 09, 2025 | 6:09 PM

India Pakistan War Updates : पाकिस्तानकडून 2 दिवसांपासून सातत्याने सीमावर्ती भागात हल्ले केले जात आहे. या हल्ल्यांना भारतीय जवान चोख प्रत्युत्तर देखील देत आहेत. यावर सीमेवरील गावात राहणाऱ्या नागरिकांचं मत काय आहे? याचा आढावा टीव्ही 9मराठीच्या प्रतिनिधीने घेतला आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर असलेलं रोडला कलाह हे शेवटचं गांव आहे. यानंतर इथून पुढे पाकिस्तान सुरू होतो. याठिकाणी सध्या भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बंकर उभारण्यात आलेले आहेत. या बंकर लाइनवरती मोठ्या प्रमाणात बीएसएफचे जवान देखील तैनात करण्यात आलेले आहेत. याच बंकरचा आधार घेऊन भारतीय जवान पाकिस्तानी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. या गावात सध्या काहीसं भीतीचं वातावरण असलं तरी भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याला योग्य ते उत्तर दिलंच पाहिजे असं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणण आहे. गावातील सर्व नागरिक हे भारतीय सैन्यांसोबत असल्याचं देखील यावेळी इथल्या ग्रामस्थांनी म्हंटलं आहे.

Published on: May 09, 2025 06:08 PM