Ministry of External Affairs : दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट आहे, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं

Ministry of External Affairs : दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट आहे, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं

| Updated on: May 08, 2025 | 6:42 PM

India Air Strike On Pakistan : भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवलं जात आहे. काल पाकिस्तानातले 9 अतिरेकी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर आज भारतीय लष्कराने पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे. याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन दिली.

आमचा हेतू फक्त उत्तर देणं आहे. आमचं टार्गेट ठरलेलं आहे. मिल्ट्री टार्गेट नाही. फक्त पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट आहे. पाकिस्तान अनेक वर्षापासून दहशतवादी कारवाया करत आहेत. एलओसीवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधी करण्यात येत आहे. साजिद मीरचा मृत्यू झाला आहे, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हंटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेऊन आज पाकिस्तान झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या कारवाईची माहिती देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना विक्रम मिस्री यांनी सांगितलं की, २२ एप्रिलच्या पहलगामच्या हल्ल्यानंतर उत्तर देणं सुरू झालं आहे. काल भारतीय सैन्याने कारवाई करून उत्तर दिलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत आम्ही पहलगामचा विषय काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पाकिस्तानने टीआरएफचा विषय काढला. टीआरएफला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यास पाकिस्तानने विरोध केला. त्यानंतर २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये टीआरएफने हल्ला केला. त्यामुळे आमचा हेतु हा फक्त उत्तर देणं आहे, असं मिस्री यांनी स्पष्ट केलं आहे.

Published on: May 08, 2025 06:42 PM