India vs Pakistan War : भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?

India vs Pakistan War : भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?

| Updated on: May 09, 2025 | 8:57 AM

India - Pakistan Warr Updates : ऑपरेशन सिंदूर नंतर घाबरलेल्या पाकिस्तानकडून काल रात्री भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. हे सर्व हल्ले भारतीय लष्कराने परतवून लावले आहेत.

घाबरलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागांना काल रात्री निशाणा बनवल. यावेळी भारताने जल, थल, आकाश अशा तिन्ही बाजूंनी पाकिस्तानवर घणाघात करून सर्व वार परतवून लावले आहेत. यावेळी भारतीय नौदलाने कराची बंदरावर सर्वात मोठा हल्ला चढवला आहे. 1917 सालानंतर समुद्रमार्गे आयएनएस विक्रांतचा ड्रोन हल्ला चढवला. भारताने पाकिस्तानच्या 8 मोठ्या शहरांवर ड्रोन हल्ला केला आहे. राजधानी इस्लामाबाद, लाहोर, पेशावरमध्ये रात्रीतून हल्ला चढवत चोख प्रत्युत्तर दिलं. काल संध्याकाळपासून पाकिस्तानने भारताच्या 14 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. जम्मू, पंजाब, राजस्थान सीमेवर पाकिस्तानने मिसाईल हल्ले केले. पठाणकोट एअरबेसवर असलेला हल्ल्याचा मनसुबा भारतीय सैन्याने हाणून पडला. वैष्णवदेवी भागातला पाकिस्तानचा हल्ल्याचा मनसुबा देखील भारताने उधळून लावला.

Published on: May 09, 2025 08:57 AM