Operation Sindoor : गोळ्या पाकनं झाडल्या, भारतानं धमका केला, भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरबद्दल सारं काही सांगितलं…

Operation Sindoor : गोळ्या पाकनं झाडल्या, भारतानं धमका केला, भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरबद्दल सारं काही सांगितलं…

| Updated on: May 20, 2025 | 4:07 PM

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याच्या तोफखान्याने जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये धैर्य आणि अचूकतेचे शक्तिशाली प्रदर्शन करून पाकिस्तानला योग्य उत्तर दिले. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले तेव्हा भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर दिले.

भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला पराभूत केले आणि चांगलाच धडा शिकवला. या हवाई हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्याबद्दल संपूर्ण देशाला भारतीय सैन्याचा अभिमान आहे. भारताच्या हल्ल्यानंतर आजही पाकिस्तानला धडकी भरली आहे. पाकिस्तान जगाकडे मदतीची याचना करताना दिसत आहे. युद्धबंदीनंतर, भारतीय लष्कराच्या एका सैनिकानं संपूर्ण ऑपरेशन सिंदूर बद्दलची माहिती दिली.

भारतीय सैन्यातील एका सैनिकानं भारतीय सैन्याच्या शौर्याची कहाणी सांगितली. तो म्हणाला “पाकिस्तानने गोळ्या झाडल्या पण भारतानं स्फोट घडवून आणला. ऑपरेशन सिंदूर हे केवळ पलटवार नव्हता तर तो एक विचारपूर्वक आणि ध्येयाभिमुख स्ट्राईक होता. आमचा हेतू अगदी स्पष्ट होता की, आम्हाला शत्रूच्या दहशतवादी पायाभूत सुविधा आणि घुसखोरीला मदत करणाऱ्या चौक्या नष्ट करायच्या होत्या. यासाठी भारत मानसिक, रणनीतिक आणि तर्कबुद्धीने पूर्णपणे तयार होता, असे सांगितले. भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे कसे उद्ध्वस्त केले? याबद्दल सारं काही सांगितलं बघा व्हिडीओ …

Published on: May 20, 2025 04:07 PM