Indian Army Press Conference : केलार आणि त्रालच्या दहशतवादी कारवायांबद्दल सैन्यदलाची पत्रकार परिषद

Indian Army Press Conference : केलार आणि त्रालच्या दहशतवादी कारवायांबद्दल सैन्यदलाची पत्रकार परिषद

| Updated on: May 16, 2025 | 12:56 PM

Indian Army Press Conference Video : केलार आणि त्राल भागात दहशतवादाच्या विरोधात भारतीय सैन्यदलाने केलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी आज लष्कराकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.

भारतीय लष्कराने आज पत्रकार परिषद घेऊन जम्मू – काश्मीरच्या केलार आणि त्राल भागात दहशतवादविरोधी केलेल्या कारवायांची माहिती दिली आहे.

या कारवाईबद्दल बोलताना जीओसी व्ही फोर्सचे मेजर जनरल धनंजय जोशी म्हणाले, १२ मे रोजी, आम्हाला केलरमधील उंच भागात दहशतवादी गटाच्या उपस्थितीची माहिती मिळाली. १३ मे रोजी सकाळी, काही हालचाली आढळून आल्यानंतर, आमच्या पथकांनी दहशतवाद्यांना आव्हान दिले, ज्यांनी गोळीबार करून प्रत्युत्तर दिले. आमच्या पथकांनी त्यांना निष्क्रिय केले. त्राल भागातील दुसरी कारवाई सीमावर्ती गावात करण्यात आली. आम्ही या गावाला घेराव घालत असताना, दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या घरांमध्ये स्वतःला तैनात केले आणि आमच्यावर गोळीबार केला. यावेळी, आमच्यासमोर नागरी ग्रामस्थांना वाचवण्याचे आव्हान होते. त्यानंतर, तीन दहशतवाद्यांना निष्क्रिय करण्यात आले. ६ दहशतवाद्यांपैकी एक, शाहिद कुट्टे, एका जर्मन पर्यटकावर हल्लासह दोन मोठ्या हल्ल्यांमध्ये सहभागी होता. तो उपक्रमांना निधी देण्यातही हातभार लावत होता, असं त्यांनी सांगितलं.

Published on: May 16, 2025 12:56 PM