भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले

| Updated on: Jul 15, 2025 | 4:14 PM

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे आज पृथ्वीवर सुखरूप उतरले आहे.

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर आज, 15 जुलै रोजी सुखरूप उतरले आहे. शुभांशू यांनी सुमारे 18 दिवस अंतराळात घालवले, ज्या काळात त्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केले. 25 जून 2025 रोजी ते फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून फाल्कन 9 रॉकेटद्वारे अंतराळात रवाना झाले होते.

शुभांशू आणि त्यांचे अमेरिका, पोलंड आणि हंगेरीतील तीन सहकारी अंतराळवीर 14 जुलै 2025 रोजी दुपारी 4:45 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीकडे परतण्यास निघाले. आता सर्व अंतराळवीर पृथ्वीवर परतले असून, त्यांना समुद्रातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, शुभांशू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आणि अंतराळातील त्यांच्या शरीरावर झालेल्या परिणामांतून बरे होण्यासाठी 10 दिवस देखरेखीखाली ठेवले जाणार आहेत. त्यानंतर ते भारतात परतण्याची शक्यता आहे.

Published on: Jul 15, 2025 04:13 PM