Indrayani River Bridge : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं घडलं काय?
कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पुलावर पर्यटकांनी दुचाकी नेल्यानं ओव्हारवेट होऊन पूल कोसळल्याची माहिती समोर येत असून अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली.
पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल आज कोसळला. रविवार दुपारी 3:30 च्या सुमारास हा लोखंडी पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. रविवार असल्याने बरेच पर्यटक वर्षा विहारासाठी आले होते. यातील कित्येकांनी जीर्ण अवस्थेत असलेल्या पुलावर वाहनं उभी केली आणि ओव्हरलोड झाल्याने पूल कोसळला. दुर्घटनेमध्ये एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी 18 व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 25 पेक्षाही अधिक लोकं या नदीत वाहून गेलीत तर काहीजण पुलाखाली दबली गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, घटनास्थळी पुण्याचे जिल्हाधिकारी दाखल होत त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं याची माहिती देत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देणार असल्याचे जाहीर केले.
Published on: Jun 15, 2025 08:40 PM
