Amol Kolhe on PM Modi | पंतप्रधान Narendra Modi यांचा निषेध काही देशात केला जातोय हे खेदजनक

| Updated on: Jun 08, 2022 | 7:12 PM

पंतप्रधान हे केवळ व्यक्ती नसून ती एक इंन्स्टीट्यूशन आहे. या इन्स्टीट्यूशनचा मान राखला गेला पाहिजे. देशाच्या प्रत्येक नागरिकाने पंतप्रधान पदाचा अभिमान हा बाळगळाच पाहिजे असे खासदार कोल्हे म्हणाले.

Follow us on

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या विविध भागात मुस्लिम समाजाला (Muslim Society) टार्गेट करण्यात येत आहे. त्यांच्यावर अत्याचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. कर्नाटकात हिजाबला विरोध करण्यात येत आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये बुल्डोझर चालत आहे. त्यामुळे मुस्लिम समाजात उद्रेकासह भीतीचे वातावरण बनले आहे. त्याचत ज्ञानवापी मशिदीवरूनही वादंग माजला आहे. त्यातच भाजपच्या दोन प्रवक्त्यांनी महंमद पैंगबर (Mohammad Paigambar) याच्यांवर वादग्रस्त विधान केले होते. त्यावर भाजपच्या कोणत्याच नेत्याने दिलगिरी व्यक्त केली नव्हती किंवी प्रतिक्रीया दिली नव्हती. त्यामुळे देशासह मुस्लिम राष्ट्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी निषेध केला. त्यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Dr Amol kolhe) यांनी हे खेदजनक असल्याचे म्हटले आहे. तर पंतप्रधान हे केवळ व्यक्ती नसून ती एक इंन्स्टीट्यूशन आहे. या इन्स्टीट्यूशनचा मान राखला गेला पाहिजे. देशाच्या प्रत्येक नागरिकाने पंतप्रधान पदाचा अभिमान हा बाळगळाच पाहिजे असे खासदार कोल्हे म्हणाले. तसेच माझ्या देशाच्या पंतप्रधानांचा कुणी अवमान करत असेल, तर या देशाचा नागरिक, लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असेही खासदार कोल्हे म्हणाले.