Jalgaon News : कामाच्या शोधात कुटुंब निघालं अन् 5 जणांचा जागीच मृत्यू, नेमकं घडलं काय? जळगावातील घटनेनं सगळेच हादरले

Jalgaon News : कामाच्या शोधात कुटुंब निघालं अन् 5 जणांचा जागीच मृत्यू, नेमकं घडलं काय? जळगावातील घटनेनं सगळेच हादरले

| Updated on: Aug 20, 2025 | 5:04 PM

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या ठिकाणची सर्व तार तसेच वायर जप्त केले आहेत. याच शेतामध्ये विजेच्या धक्क्याने दोन रानडुकरांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती समोर आली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एरंडोलच्या खेडी गावाजवळ शेतातून जात असताना विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर गावातील सगळेच जण हादरलेत. विजेच्या धक्क्याने दगावलेल्या पाचही जणांची ओळख पटली असून ते मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील मूळ मूळ रहिवासी आहेत. या दुर्दैवी घटनेत विकास रामलाल पावरा, त्यांची पत्नी सुमन पावरा, त्यांची दोन्ही मुले पवन पावरा, कवल पावरा आणि त्यांची सासू या पाच जणांचा विजेचा शॉक लागताच जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले विकास पावरा यांची दीड वर्षांची मुलगी दुर्गा पावरा तिचे दैवबलत्तर म्हणून या घटनेमध्ये सुदैवाने बचावली असल्याचे सांगितले जात आहे.

पावरा कुटुंब पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव गावात कामाला होतं. कामाच्या शोधात ते आज पहाटेच या शेतात आले होते. यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. शेतामध्ये वन्य प्राण्यांपासून पिकांच्या सुरक्षिततेसाठी लावलेल्या वीजतारांचा झटका लागून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. घटनेनंतर पोलिसांनी शेतमालकाला ताब्यात घेतला असून त्याच्याविरुद्ध एरंडोल पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाच गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Published on: Aug 20, 2025 04:58 PM