निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगलीचा प्रयत्न होऊ शकतो, गृहखात्यानं सतर्क राहण्याची गरज : जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी राज्यातील राजकीय स्थितीवरुन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सूचना केली आहे. राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगल घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. राज्य सरकारनं आणि गृहविभागानं सतर्क राहावं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी राज्यातील राजकीय स्थितीवरुन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सूचना केली आहे. राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगल घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. राज्य सरकारनं आणि गृहविभागानं सतर्क राहावं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यात सध्या विविध प्रश्नांवरुन आंदोलन होण्याची शक्यता आहे.
