Solapur | सोलापुरात क्रूजर जीपचा टायर फूटला, अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू

Solapur | सोलापुरात क्रूजर जीपचा टायर फूटला, अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 12:49 PM

सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझर जीप भीषण अपघात होऊन दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.

सोलापूर : सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या क्रुझर जीप भीषण अपघात होऊन दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.  तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना असून भरघाव जाणाऱ्या क्रुझर जीपचा टायर तुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील नवीन घरकुल येथील ही घटना असून घटनास्थळी पोलीस पोचले असून जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.