Kolhapur मध्ये Panchaganga नदीची पातळी 53 फुटांवर, Pune Bangalore Highway बंद
पुणे-बंगळुरु महामार्गावरही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. शिरोळी नाक्याजवळ महामार्गावर पाणी साचलं आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता किनी टोल नाक्यावर रोखून धरण्यात आली आहे.
पंचगंगा नदीची पाणीपातळी 53 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे आंबेवाडी आणि चिखली ही दोन गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या गावातील घरांमध्ये दुसऱ्या मजल्यापर्यंत पाही शिरलं आहे. त्यामुळे घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. दुसरीकडे पुणे-बंगळुरु महामार्गावरही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता किनी टोल नाक्यावर रोखून धरण्यात आली आहे. तसंच कोल्हापुरातून महामार्गाला जाणारे सर्व रस्तेही पाण्यामुळे बंद झाले आहेत.
