Konkan Railway Time Table : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

Konkan Railway Time Table : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

| Updated on: Jun 22, 2025 | 3:26 PM

Ganeshotsav Special Trains : गणेशोत्सव आला की कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

गणेशोत्सव आला की कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. गणपती स्पेशल गाड्यांसाठी आरक्षण उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. यंदा गणेशोत्सव मागील वर्षीपेक्षा लवकर म्हणजे 27 ऑगस्टला असल्याने, प्रवाशांना वेळेवर गावी पोहोचता यावे यासाठी कोकण रेल्वेने ही सुविधा जाहीर केली आहे.
दरम्यान, नेहमीप्रमाणे यंदा देखील गणपतीसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. गणेश चतुर्थीच्या आधी चाकरमानी कोकणात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. यासाठी कोकणातील चाकरमान्यांनी 60 दिवस आधीच आरक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळेच उद्यापासून नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण सुरू केले जात आहे. पावसाळी वेळापत्रकात आवश्यक बदल करून ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे, जेणेकरून चाकरमान्यांना त्यांच्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अडचण येऊ नये.

Published on: Jun 22, 2025 03:25 PM