Koregaon Bhima Case : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाची आजपासून सुनावणी

| Updated on: Aug 02, 2021 | 8:34 AM

आयोगातील दोन सदस्यांसमोर सुनावणीची संपूर्ण प्रक्रिया पार पडेल. कोलकाता उच्च न्यायालायचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जयनारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली भीमा कोरेगाव आयोग स्थापन करण्यात आला होता.

Follow us on

भीमा-कोरेगावमध्ये 2018 उसळलेल्या दंगलप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाच्या सुनावणीला सोमवारपासून सुरुवात होत आहे. 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीत ही सुनावणी चालणार आहे. पुण्यात ऑनलाईन पद्धतीने ही सुनावणी पार पडेल.
यावेळी भीमा-कोरेगाव दंगलीतील साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत.

आयोगातील दोन सदस्यांसमोर सुनावणीची संपूर्ण प्रक्रिया पार पडेल. कोलकाता उच्च न्यायालायचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जयनारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली भीमा कोरेगाव आयोग स्थापन करण्यात आला होता. सोमवारी रेखाताई साहेबराव शिवले आणि प्रल्हाद ईश्वर गायकवाड या दोन साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात येईल. कोरोनामुळे आयोगाचं कामकाज बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आजपासून सुनावणीला सुरुवात होईल.