कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, NDRF च्या 2 टीम सांगलीत दाखल होणार

| Updated on: Aug 12, 2022 | 1:51 PM

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. कृष्णा नदीची पाण्याची पातळी आता 29.5 फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात सातत्याने पडणारा पाऊस आणि कोयना धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे पाण्याची पातळी वाढतेय.

Follow us on

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. कृष्णा नदीची पाण्याची पातळी आता 29.5 फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात सातत्याने पडणारा पाऊस आणि कोयना धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे पाण्याची पातळी वाढतेय. याच पार्श्वभूमीवर एनडीआरएफची टीम याठिकाणी येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी दुपारपर्यंत NDRF च्या 2 टीम सांगलीत दाखल होणार आहेत. एका टीममध्ये 22 जवान असणार आहेत. अशी 44 जणांची टीम सांगलीत दाखल होणार आहे.