Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये

| Updated on: Apr 15, 2025 | 9:15 AM

Ladki Bahin Yojana Installation Updates : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी फक्त 500 रुपये हप्ता दिला जाणार आहे.

राज्यातल्या 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांएवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत. महायुती सरकारकडून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र आता तब्बल 8 लाख लाडक्या बहिणींच्या या पैशांना कात्री लागणार असून् त्यांना केवळ 500 रुपये इतकाच हप्ता मिळणार आहे.

राज्यातल्या 8 लाख महिलांना नमो शेतकरी कार्यक्रमांतर्गत 1 हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जातो. त्यामुळे अशा महिलांना जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना केवळ 500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. अशा महिलांच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात कपात केली जाणार आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेतून 8 लाख महिला या 2 योजनांचा लाभ घेत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या महिन्याच्या हप्त्यात अशा लाडक्या बहिणींना केवळ 500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे.

Published on: Apr 15, 2025 09:15 AM