Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा, 12 हजार फसव्या भावांनी 13 महिने घेतले प्रत्येकी दीड हजार!

Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा, 12 हजार फसव्या भावांनी 13 महिने घेतले प्रत्येकी दीड हजार!

| Updated on: Oct 22, 2025 | 10:36 AM

लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात 12 हजार भावांनी 13 महिन्यांसाठी प्रत्येकी दीड हजार रुपये घेतले. महिला बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला असून, प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.

लाडकी बहीण योजनेत 164 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मोठी माहिती उघड झाली आहे. तब्बल 12 हजार भावांनी या योजनेअंतर्गत तब्बल 13 महिने प्रत्येकी दीड हजार रुपये घेतले. ही रक्कम मिळून एकूण 164 कोटींचा अपहार झाल्याचे बोलले जात आहे. हा गंभीर आरोप समोर आल्यानंतर महिला बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. योजनेचे नाव लाडकी बहीण योजना असे असताना, त्याचा लाभ भावांनी घेतल्याने या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारी योजनेतील या कथित घोटाळ्यामुळे संबंधित विभागाच्या कामकाजावर टीका होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राजकीय आणि सामाजिक स्तरावरून केली जात आहे.

Published on: Oct 22, 2025 10:36 AM