‘उद्या मेल तर काय फरक पडतो असेही ‘ते’ म्हणतील’; दादा भुसे यांच्या त्या वक्तव्यावर विरोधी पक्ष नेत्याची बोचरी टीका

‘उद्या मेल तर काय फरक पडतो असेही ‘ते’ म्हणतील’; दादा भुसे यांच्या त्या वक्तव्यावर विरोधी पक्ष नेत्याची बोचरी टीका

| Updated on: Aug 22, 2023 | 2:00 PM

राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मिठ चोळणारं वक्तव्य केलं होतं. त्यांनी कांदा महाग होतं असेल तर दोन एक महिने खाऊ नका असे म्हटलं होतं. त्यावरून आता त्यांच्यावर टीका होत आहे.

औरंगाबाद : 22 ऑगस्ट 2023 | राज्यात कांद्यावरून रणकंदन माजले आहे. अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन होत आहे. तर कांदा रस्त्यावर फेकून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे. याचदरम्यान आता केंद्राने मोठी घोषणा करत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या त्या वक्तव्यावरून सध्या राजकारण तापलं असून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकार आणि त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. दानवे यांनी हे सरकार असंवेदनशील आहेच. पण या सरकारमधील मंत्री देखील असंवेदनशील आहेत. कांदा खाणं न खाणं या पेक्षा ते उद्या जेवलं नाही, म्हणून मेलं तर काय फरक पडतो असे देखील म्हणतील अशी टीका केली आहे. तर अशी टीका करणारे मंत्री नसतील तर काय फरक पडणारय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Aug 22, 2023 02:00 PM