Dadar | दादरमधील पुरातन हनुमान मंदिर अनधिकृत असल्याचं रेल्वे प्रशासनाचं पत्र

| Updated on: Aug 09, 2021 | 7:32 PM

या मंदिराला धकका लागून देणार नाही. आज मानवी साखळी पकडून आंदोलन करत आहे. मात्र यातून मार्ग निघाला नाही. तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी दिला आहे.

Follow us on

YouTube video player

मुंबई : मुंबईतील दादर पूर्व इथल्या पुरातन हनुमान मंदिराला बेकायदेशीर नोटीस रेल्वे प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले. केंद्र सरकारची मंदीरांबाबत दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे राममंदीर बांधण्याबाबत आक्रोश करायचा. दुसरीकडे रामाचा दूत हनुमान यांचे मंदिर तोडण्यासाठी नोटीसा बजावायच्या. हे मंदिर ७५ वर्ष जुनं आहे. या परिसरातल्याच नाहीतर येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराला धकका लागून देणार नाही. आज मानवी साखळी पकडून आंदोलन करत आहे. मात्र यातून मार्ग निघाला नाही. तर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी दिला आहे.