लोकसभा निवडणूक मोदींचा एकप्रकारचा मॅचफिक्सिंगचा प्रयत्न आहे, राहुल गांधी यांचा आरोप

| Updated on: Mar 31, 2024 | 6:22 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर विरोधी पक्ष एकवटला आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने दिल्लीतील राम लीला मैदानात 'लोकतंत्र बचाव' रॅली आयोजित केली आहे. या रॅलीला संबोधित करताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

दिल्ली : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. ही लोकसभा निवडणूक एक प्रकारची मॅच फिक्सिंग करण्याच्या प्रयत्न असल्याची टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली येथील ‘लोकतंत्र बचाव’ रॅलीत केली आहे. अब की बार चारशे पारचा नारा हा बिना ईव्हीएम, बिना मॅचफिक्सिंग, तसेच सोशल मिडीया आणि प्रेसवर दबाव आणल्या शिवाय सत्यात येऊ शकत नाही. सर्व मिळून ते 180 च्या पार जाऊ नाही शकत म्हणून त्यांनी मॅचफिक्सिंगद्वारे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कॉंग्रेस पक्ष हा विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष आहे. परंतू ऐन निवडणूकीत आमची सर्व बॅंक खाती गोठवली आहेत. आम्ही प्रचाराचा खर्च कसा करायचा, कॅंपेन करायचा आहे ? प्रवासाचा खर्च करायचा आहे. पोस्टर्स कशी छापायची असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. नेत्यांना धमकावले जात आहे. त्यांना तुरुंगात पाठविले जात आहे. ही संपूर्ण मॅचफिक्सिंग करण्याचा प्रयत्न सुरु असून तो एकटे नरेंद्र मोदी करीत नाहीत तर हिंदूस्थानचे तीन-चार मोठे अब्जोपती करीत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

Published on: Mar 31, 2024 05:07 PM