शिरूर लोकसभेचं तिकीट कंफर्म होताच कोल्हे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी पुन्हा येईन म्हणायला भीती वाटते’

| Updated on: Jun 05, 2023 | 2:21 PM

याचदरम्यान शिरूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच पहायला मिळाली. येथे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी या लोकसभेसाठी दंड थोपटले होते. त्यांनी या जागेवर दावा केला होता. त्यामुळे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे याचं काय असा सवाल अनेकांच्या मनात येत होता.

Follow us on

पुणे : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात कोणता पक्ष कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान शिरूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच पहायला मिळाली. येथे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी या लोकसभेसाठी दंड थोपटले होते. त्यांनी या जागेवर दावा केला होता. त्यामुळे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे याचं काय असा सवाल अनेकांच्या मनात येत होता. मात्र आता यावरून लांडे यांनीच पडदा उचलताना शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत कोल्हे हेच उमेदवार असणार आहेत. याचदरम्यान कोल्हे यांनी याबाबतीत पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी शरद पवार आणि अजित पवार जो निर्णय घेतील त्याच्यासोबत जाणार असल्याचे सांगत येत्या वर्षभरात जनसंपर्क पुन्हा वाढवणार असल्याचे म्हटलं आहे. तर 4 वर्षाचे मूल्यमापन केलं तर चार वर्षात 47 कोटींची काम केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन म्हणायला भीती वाटते अशी मुश्किल वक्तव्यही केलं.