Mahadev Munde Case : नेमकं दडलंय तरी काय? 23 महिन्यांनंतरही आरोपी फरार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा सरकारलाच संतप्त सवाल

Mahadev Munde Case : नेमकं दडलंय तरी काय? 23 महिन्यांनंतरही आरोपी फरार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा सरकारलाच संतप्त सवाल

| Updated on: Oct 03, 2025 | 2:45 PM

महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी २३ महिन्यांनंतरही सापडले नसल्याने त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात काय दडले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महादेव मुंडे हत्या प्रकरणात २३ महिने उलटूनही आरोपी निष्पन्न झाले नसल्याने त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. येत्या २१ ऑक्टोबर रोजी या घटनेला दोन वर्षे पूर्ण होत असतानाही, आरोपींपर्यंत पोहोचण्यात यंत्रणेला यश का आले नाही, असा संतप्त सवाल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे.या प्रकरणात नेमके काय दडले आहे, हे जगासमोर येऊ द्यावे अशी त्यांची मागणी आहे.

त्यांनी थेट विचारणा केली की, मुख्यमंत्री साहेबांकडून एसआयटीची नियुक्ती करूनही आरोपींपर्यंत पोहोचण्यात अडचण का येत आहे. एसआयटी स्थापन होऊनही दोन महिने उलटले तरी एकही आरोपी निष्पन्न न झाल्याने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्याय मिळण्यासाठी किती वेळ प्रतीक्षा करावी लागणार, अशी खंत व्यक्त केली. या गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार अजूनही मोकळेच असल्याने पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Published on: Oct 03, 2025 02:45 PM