MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 27 June 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 27 June 2021

| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 1:07 PM

शिवसेनेच्या तिवसा शहर प्रमुखाच्या हत्येने अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. 34 वर्षीय अमोल पाटील याची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या करण्यात आली.

शिवसेनेच्या तिवसा शहर प्रमुखाच्या हत्येने अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. 34 वर्षीय अमोल पाटील याची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या करण्यात आली. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा शहरातील आशीर्वाद वाईन बारसमोर शनिवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अमोल पाटील याच्यावर यापूर्वी दोन हत्या केल्याचा आरोप होता.

त्याला दीड महिन्यांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपार होण्याचा आदेशही काढला होता. अवैध उद्योगातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. अमोल पाटील मित्रासोबत शनिवारी रात्री आशीर्वाद बारमध्ये गेला होता. मात्र बार बंद झाल्याने दोघंही बारसमोर बसले होते. यावेळी दोन ते तीन जणांनी अमोल पाटीलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले.

Published on: Jun 27, 2021 01:06 PM