MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 03 October 2022 -TV9

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 03 October 2022 -TV9

| Updated on: Oct 03, 2022 | 4:25 PM

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला राष्ट्रवादीने पांठिबा जाहिर केला आहे. तर आपण उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दसरा मेळाव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना आणि शिंदे गटाला सल्ला दिला आहे. तसेच, दसरा मेळाव्यावरून मर्यादा ओलांडू नका असेही पवार म्हणाले. तर शिवसेनच्या धनुष्यबाण चिन्हावर आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. अंधेरीची पोटनिवडणूक होणार असून त्याआधी निवडणूक आयोग यावर निर्णय घ्यावा लागणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला राष्ट्रवादीने पांठिबा जाहिर केला आहे. तर आपण उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला बोलावलं तर जाईन. पण उद्धव ठाकरे मला बोलावणार नाही असा खुलासाही नारायण राणे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांनी गिरीष महाजन यांनी केलेल्या खुलाशावर स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. तसेच मिटवून टाका असं मी बोललोच नाही असेही ते म्हणाले.

Published on: Oct 03, 2022 04:25 PM