आरक्षणासाठी बंजारा समाजातील युवकाने उचललं टोकाचं पाऊलंं
धाराशिव येथील मुरूम गावातील एका बंजारा समाजातील 32 वर्षीय युवकाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली आहे. त्याच्या सुसाईड नोटमध्ये हैदराबाद गॅझेटमध्ये एसटी आरक्षणाचा उल्लेख आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
धाराशिव तालुक्यातील मुरूम गावात एका दुर्दैवी घटनेने सर्वांना हादरवले आहे. बंजारा समाजातील 32 वर्षीय मयूर नावाच्या युवकाने आत्महत्या केली आहे. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजासाठी एसटी आरक्षणाची मागणी असतानाही ते मिळत नाही. त्यामुळे निराश होऊन त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा निर्माण केली आहे. मयूरच्या कुटुंबियांना आणि संपूर्ण बंजारा समाजाला या दुर्दैवी घटनेने मोठा धक्का बसला आहे.
Published on: Sep 13, 2025 04:05 PM
