महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकरणाची माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथील महादेव मुंडे हत्याप्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात कोणीही दोषी असला तरी त्याला सोडले जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या हत्येप्रकरणी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीची माहिती देताना सांगितले, मी गेल्या 21 महिन्यांतील या प्रकरणाचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. माझे म्हणणे ऐकून मुख्यमंत्री भावनिक झाले. त्यांनी कोणत्याही दोषीला सोडणार नाही, असा शब्द दिला. पुढे त्या म्हणाल्या, “महादेव मुंडे हत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आणि आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले. त्यांनी तातडीने बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून या प्रकरणात कारवाई करण्याचे सांगितले.
